हैदराबाद येथील पिडीत बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा; गोर सेनेचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । हैदराबाद येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधात कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुठल्याही असे कृत्य होणार नाही. या मागणीसाठी आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोर सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हैदराबाद येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमांना तातडीने कठोरात कठोर शिक्षा मिळावी, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने ५० लाख रुपयांची मदत मिळावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावा आणि पिडीत कुटुंबियातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, चिमुकलीला तातडीने न्याय न मिळाल्यास भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्या असून याला जबाबदार सरकार असेल तसे नमूद केले. या मागणीसाठी आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर ज्ञानेश्वर राठोड, चेतन जाधव, अभिजित चव्हाण, निलेश राठोड, राहुल पवार, सिताराम चव्हाण, अनिल नाईक, सुरेश राठोड, योगेश चव्हाण, चेतन चव्हाण, निलेश राठोड, अरुण राठोड, किरण राठोड, रघुनाथ राठोड, अनिल जाधव, अर्जुन राठोड, राहुल चव्हाण, संतोष चव्हाण, योगेश पवार, विशाल चव्हाण, विशाल जाधव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Protected Content