रात्री संचारबंदीसह सण, उत्सव मेळाव्यास कडक नियमन

मुंबई वृत्तसंस्था | देशात ‘कोविड १९’ च्या ‘ओमायक्रॉन’ या नव्याने दाखल झालेल्या व्हेरीयेंटच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्यात रात्री संचारबंदीसह सण, उत्सव मेळाव्यास कडक नियमन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत आढवा बैठक घेऊन लसीकरणासह ओमायक्रॉन विरोधातील लढ्याच्या तयारीबाबतची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाकडेही लक्ष वेधत काही मागर्दर्शक सूचना दिल्यात.

“यात ज्यावेळी ऑक्सिजनयुक्त बेडची व्याप्ती ४०% पेक्षा जास्त वाढल्यावर किंवा रुग्ण पॉझिटीव्हीटी १० % पेक्षा जास्त वाढल्यावर जिल्हा तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे स्थानिक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतील. मात्र तत्पूर्वी ओमायक्रॉनची क्षमता लक्षात घेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या स्थितीत पोहोचण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करुन निर्बंध लादू शकतात” असे आरोग्य सचिव यांनी याप्रसंगी सांगितले.

“ओमायक्रॉन’ या नव्याने दाखल झालेल्या व्हेरीयेंटच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सध्या सुरु असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या संदर्भात कठोर नियंत्रण करावं. रात्री संचारबंदी लावावी. विशेष करुन सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मेळाव्याचे कडक नियमन करावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत प्रतिबंधित क्षेत्र, सुरक्षीत क्षेत्र याची यादी तयार करावी. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवावेत नागरिकांना वारंवार सूचना आणि माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहत माध्यमांना नियमितपणे परिस्थितीबद्दल माहिती द्या. लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस आणि दुसरा डोस बाकी असणाऱ्यांचेही तात्काळ लसीकरण करत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. यासंबंधी मागर्दर्शक सूचना याप्रसंगी देण्यात आल्यात.

 

Protected Content