अमृत योजना जलवाहिनी टप्पा २ सल्लागार नेमणुकीवर महासभेत वादळी चर्चा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमृत योजना जलवाहिनी टप्पा २ या योजनेचा व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीवर महासभेत जोरदार वादळी चर्चा होवून हा विषय सर्वानुमते तहकुब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

अमृत योजना जलवाहिनी टप्पा २ या योजनेचा व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला नेमावे कि आधी नियुक्त केलेल्या निर्सग कन्सल्टीला नेमामे याबाबत आज झालेल्या महासभेत तब्बल तीन तास चर्चा रंगीली. यात शिवसेनेने  प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावाला विरोध केला.  आधी नेमणूक केलेल्या एजन्सीचा करार रद्द करून पुढील धोरण ठरविण्याचे भूमिका यावेळी मांडण्यात आली. तर भाजपने मजिप्राला व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करावी यासाठी आधी जोर धरला मात्र ठरावाला अपूर्ण संख्याबळ असल्याने अखेर त्यांना माघार घेत हा विषय सर्वानुमते तहकुब ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

 

महासभेत अमृत योजना टप्पा २ साठी विकास आरखडा तयार करणे व सादर करण्यासाठी मजीप्राला सल्लागार एजन्सी नियुक्त करावी याबाबतचा प्रस्तावर चर्चा सुरू झाली. यावर महापौर, उपमहापौर यांनी महासभेत झालेले ठराव प्रशासनाचे अधिकारी त्यावर अमंलबजावणी करत नसल्याने नाराजी व्यक्त केली. अमृत योजना टप्पा २ च्या प्रकल्पासाठी निर्सग एजन्सीला व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करणेबाबत असेच झाले आहे.  निर्सग एजन्सीला वर्क ऑडर दिल्यानंतरही  याबाबत महासभेला माहिती देण्यात आलेली नसून पदाधिकाऱ्याना  विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला.  महासभेत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही या विषयंवारून शिवसेना तसेच भाजप सदस्यांनी शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांना चांगलेच धारेवर धरले. तर महासभेच्या इतर नऊ विषयांना यावेळी सर्वानूमते मान्यता देण्यात आली.

भाग १

भाग २

Protected Content