पिंप्राळा हुडको परिसरातील अवैध धंदे बंद करा : कुलभूषण पाटील यांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे धंदे तातडीने बंद करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

पिंप्राळा हुडको परिसरामध्ये सट्टा, पट्टा, जुगार तसेच अवैध दारू या व्यवसायिकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. येथील शाळेच्या आवाराला लागूनच अवैध दारू विक्री अगदी उघडपणे करण्यात येत आहे. तर सट्टा, पत्ता, जुगार यांचे क्लब उघडपणे सुरू आहेत. यामुळे नवीन पिढी ही चुकीच्या मार्गाला जात असून अनेक कुटुंबांचे संसार यामुळे उध्वस्त झालेले आहेत. या संदर्भात नागरिकांनी आधी तक्रारी केल्या असल्या तरी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज २० ऑगस्ट मंगळवार रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करून हे प्रकार तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी मुफ्ती हारून, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, समाजसेवक असिफ शेख, माजी नगर सेविका हसीना बी शरीफ शेख, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, समाजसेवक अतुल बारी, समाजसेवक विनोद निकम उपस्थित होते.

Protected Content