ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी) कार्यरत आहेत. अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादी यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती (दर वर्षी-दर तिमाहीस)- माहे जानेवारी ते मार्च ( दि. 30 एप्रिलपर्यंत), माहे एप्रिल ते जून ( दि. 31 जुलैपर्यंत), माहे जुलै ते सप्टेंबर ( दि. 31 ऑक्टोबरपर्यंत ) आणि माहे ऑक्टोबर ते डिसेंबर ( दि. 31 जानेवारीपर्यंत ) या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक आहे.

याअनुषंगाने माहे जानेवारी ते मार्च या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1 ) या विभागाच्या संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अंतिम दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा. आणि रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा कायदा 1959, नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतूदींचे पालन करावे. असे आवाहन श्रीमती अनिसा ला. तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content