जळगाव प्रतिनिधी । शहरात संचारबंदी असतांना शिवाजी नगरातून मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व अवैध वाळूची वाहतूक होत असल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि शहर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देवूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी निलेश पवार यांनी आज शक्रवारी बोलतांना सांगितले.
शहरातील शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे शहराला जोडणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कानळदा रोड आणि ममुराबाद रोड कडून येणारी वाहतूक ही शिवाजी नगरातून वळविण्यात आली आहे. दरम्यान, रोड पुर्णपणे खराब झाल्यामुळे मध्यरात्री वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहने याचा रस्त्यावरून जातात. या वाहनांच्या मोठमोठ्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशी कंटाळले आहे. यासंदर्भात दीड महिन्यापुर्वी स्थानिक रहिवाशी यांनी शिवाजी नगरात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी रस्त्याचे कामा महिन्याभरात करू असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिली होती. मात्र दीड महिना होवून अद्यापपर्यंत कोणत्याही कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. रस्त्यावरील काम आणि बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी निलेश पवार यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणत्याही पध्दतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आपण भविष्यात आंदोलन करणार असून याला जिल्हा प्रशासना जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1083281312167790