ऐनपुरात किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक; आठ जण जखमी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ऐनपूर येथे किरकोळ कारणावरुन दोन गटात दगडफेक झाली. यात आठ जण जखमी झाले आहे. रात्री उशीरापर्यंत तणावपुर्ण शांतता होती.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील शेरा वाड्यात किरकोळ करणावरून शनिवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास  दोन गटात वाद होवून दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकमध्ये आठ जखमी झाले असून यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्निल उणवने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रात्री उशीरापर्यंत तणावपुर्ण शांतता होती. याप्रकरणी अद्याप पोलीसांनी कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content