हरियाणामध्ये रॅलीवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ ; अनेक जण जखमी

नवीन दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हरियाणा राज्यातील नूंहमध्ये ब्रिज मंडळ यात्रेवर काही इतर समाजातील लोकांनी तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत अनेकजण गंभीररित्या जखमी झालेत. तर काही गाड्यांना आग लावली आहे. या तणावामुळे मंदिर परिसरात ५ हजारहून अधिक लोक अडकले आहेत.

 

चिघळलेली परिस्थिती पाहून नूंह आणि हथीन येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली आहे. गुरुग्राममधून शेकडो वाहनांमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही नलहुद शिव मंदिर नूह येथे भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक प्रताप सिंह हे देखील आहेत.

 

यात्रा शिवमंदिर नळ हुड येथे पोहोचताच एका समाजाच्या समाजकंटक लोकांनी यात्रेवर दगडफेक केली.  पोलीस अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. किती जण जखमी झालेत याची माहितीही देण्यात आलेली नाही.  जवळच्या गावातील विशिष्ट समाजाचे लोक तलवारी आणि खंजीर घेऊन नुह येथे पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांनी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

Protected Content