Home क्राईम पहूर येथे दगडफेक; ८ जणांना अटक

पहूर येथे दगडफेक; ८ जणांना अटक


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बैठकीसाठी एकत्रित आलेल्या नागरिकांवर अज्ञात लोकांनी केलेल्या दगडफेकीनंतर पहूर येथील लेले नगर भागात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास  वाहनांची तोडफोड झाल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे .प्रकरणी शेख अल्ताफ शेख सईद वय ३० रा. पहूर कसबे यांच्या फिर्यादी वरून संदीप बाबुराव कुमावत, ईश्वर अशोक पाटील , निलेश रामचंद्र घोंगडे, शिवराज भास्कर देशमुख, सोपान रामदास चौधरी, अमोल शिवराम सोनवणे, राहूल सुकलाल काळे, प्रदीप रायदास पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान गावात तणावपूर्ण  शांतता आहे . शांतता राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकारी शांतता अबाधित राखण्या कमी प्रयत्न आहेत. राज्य राखीव दलाच्या तुकड्या पहूर मध्ये दाखल झाले असून घटनास्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे .


Protected Content

Play sound