चोरी गेलेला डंपर जळगावात जप्त

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालेगाव येथून चोरी झालेला डंपर हा एमआयडीसी परिसरातून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस शोध घेतला असता, हा डंपर फातेमा नगरात निर्जनस्थळी उभा असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने कारवाई करीत हा डंपर ताब्यात घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऋषीकेश महारु मोरे यांच्या मालकीचा (एमएच १५, डीके ९७५३) क्रमांकाचा डंपर लोनवाडे येथून ल ११ डिसेंबर रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा डंपर जळगावच्या दिशेने गेल्याची माहिती तपासधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील शरद बागल, पोना योगेश बारी, विशाल कोळी व राहुल रगडे यांना डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, त्यांना डंपर एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच संपुर्ण परिसरात शोध घेतला असता, शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता हा डंपर फातेमा नगरातील निर्जन स्थळी उभा असलयाचे आढळून आले. पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून तो मालेगाव तालुका पोलिसांच्या स्वाधीन केला.

Protected Content