जळगाव तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरीला

theftr 201903207732

 

जळगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयासमोर लावलेली दुचाकीला अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 10 जून रोजी सकाळी घडली होती. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे तेथील रहिवाशांना दुचाकीने ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे काही जण तहसील कार्यालय आवारात दुचाकी लावून आपल्या दैनंदिन कामासाठी निघून जात असतात. याच पद्धतीने 10 जून रोजी सुमेध विलास सोनवणे (वय 26, रा. शिवाजीनगर) यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच 19 बीव्ही 0550) ही तहसील कार्यालया शेजारी असलेल्या पासपोर्ट ऑफिसजवळ सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास लावलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र, दुचाकी लावलेल्या ठिकाणी आठळून आली नाही. म्हणून सुमेध सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content