मुंबई प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या लॉकडाऊनमधील काही अटी काढून टाकत अनलॉकची प्रक्रिया गतीमान करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिले आहेत.
काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली असून याबाबत टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्राचे वृत्त दिले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, लॉकडाउन हा शब्द मी वापरत नाही आहे. याला मी अनलॉकडाउन असे म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आपण आहोत. याशिवाय ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोना नियंत्रणासाठी कृती गट प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासोबतच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकार ३१ जुलैनंतरचे धोरण ठरवण्यासाठी केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. निर्बंध शिथील होतील तसेच निर्णय घेण्याची राज्यांना मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना केंद्राच्या सूचनांवरच अवलंबून असतील. राज्यामध्ये जीम, रेस्तराँ आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासह शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी मिळणार नसल्याचे संकेत आहेत.