ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा २८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संप

चोपडा प्रतिनिधी । येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी संप आयोजित करण्यात आला आहे. या संपात जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवावे व ग्रामपंचायत समोर सकाळी आठ वाजता धरणे करावीत असे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी येथे आयोजित ग्रामपंचायत कर्मचारी विजयी मेळाव्यात केले.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना महाराष्ट्र शासनाने १० ऑगस्ट २०२० रोजी वेतनामध्ये ५७ टक्के पगार वाढ केलेली आहे.. एकूण २७० कोटी रुपये या पगारवाढीसाठी शासनाला तरतूद करावी लागणार आहे हे जरी खरे असले आयटक ने कर्मचार्‍यांसाठी सतत पाठपुरावा केला त्याचे हे फलित आहे.. म्हणून नवीन किमान वेतन महागाई भत्ता सह १५८५०रू ते१८३५० रूपयां दरम्यान तीन परीमंडळात वाढले आहेत. ही वाढ गेली २वर्षे लढून मिळवली आहे अर्थात पगारवाढीच्या कागद हाती पडला आणि बीडिओंना निवेदन दिले म्हणजे लगेच वाढलेला पगारवाढ मिळेल ईतकी सोपी बाब नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने २७० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद व्हावी. येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी संप आयोजित करण्यात आली आहे.. या संपात जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवावे व ग्रामपंचायत समोर सकाळी आठ वाजता धरणे करावीत असे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव काम्रेड अमृत महाजन यांनी चोपडा येथे आयोजित ग्रामपंचायत कर्मचारी विजयी मेळाव्यात केले.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य समीती सदस्य सुभाष कोळी होते. ही पगार वाढ मिळण्यामागे महासंघाचे नेते अमृत महाजन यांनी ही चांगला पाठपुरावा केला म्हणून त्यांच्याबद्दल अभिनंदन करणारे वक्तव्य महिंद्र धनगर यांनी केले. तेव्हा कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून काम्रेड महाजन यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला) कर्मचार्‍यांनी पेढे भरवुन आनंद व्यक्त केला.

कॉम्रेड महाजन पुढे म्हणाले की, ही वाढीची रक्कम पदरात पडणेसाठी लढावं लागेल याची महासंघाला जाणीव आहे म्हणून येत्या २९ तारखेला कोल्हापूर येथे ग्रामीण विकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचे घरावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पगारवाढीसाठी २७०कोटी रूची आर्थिक तरतूद करा.. थकित पगार…४०कोटी रू जमा प्रोविडंट फंडाचा हिशोब द्यावा दरमहा नियमित पुर्ण पगार आदी मागण्या महासंघ ने सादर केलेल्या आहेत असे सांगितले. त्यासाठी चोपडे तालुक्यातून दहा कर्मचारी जाणार आहेत असे निश्‍चित करण्यात आले मिळाल्यानंतर कर्मचार्‍यांनी एक दुसर्‍याला कडून भरून आनंद व्यक्त केला पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री लोखंडे साहेब तसेच इतरांना घेऊन तोंड गोड करण्यात आले असेल माहिती तसेच पगारवाढीच्या आनंद व्यक्त केला सत्तार तडवी तालुका अध्यक्ष यांनी आभार मानले. सुनील कोळी, कांतीलाल पाटील, रवींद्र पाटील, नितिन सोनार, भाऊसाहेब पाटील, अशोक गायकवाड शांताराम बाविस्कर, धनराज डावकर, हरीभाऊ पाटील, संजय पाटिल, राजेंद्र पाटील, राजु पिंप्राळे, प्रदर्शित कोळी, आत्माराम पाटिल, दिलीप चावरे, काशिनाथ पवार, अरूण पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content