जळगाव राहूल शिरसाळे । लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त नेरीनाक्यावरील पुतळ्याचे दुरूस्ती आणि सुशोभिकरण करावे या मागणीसाठी लहूजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने आज गुरूवार २२ जुलै रोजी दुपारी महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२१ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती आहे. नेरी नाका चौकात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा व पुतळावरील रंगरंगोटी, लाईट, प्रेरणादाई लिहिलेल्या कथा व शिलालेख याची दुरूस्ती करण्यात यावी, तसचे यासाठी सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या पाण्याच्या करंज्या याचे पाईप काढून दुरूस्ती करण्यात यावी. तसेच पुतळ्याच्या आजूबाजूला लावण्यात आलेले दुकाने व टपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात याव्यात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जगविख्यात साहित्यीक असून ते थोर पुरूष असल्याने महापालिकेची सर्वस्वी जबाबदारी असतांना देखील त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याची तातडीने स्वच्छता करण्यात यावी. स्वच्छता न झाल्यास महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर लहुजी ब्रिगेड महाराष्ट्रचे संस्थापक सुरेश आंभोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अशाताई आंभोरे, आदिवासी महिला आघाडीच्या सरचिटणीस मालन तडवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/4300989853324401