यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले. त्वरीत लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतू ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.
या निवेदनावर लता कोळी, विमल तडवी, ज्योती कोळी, मंगला धर्माधिकारी, सुनंदा मराठे, अर्चना धनगर, शोभा गोसावी, कस्तूरबा कोळी, सुभद्रा कोळी, सुकदेव मराठे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.