यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना लेखी निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नवीन वसाहतीमध्ये नगर परिषदच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या पाईप लाईन भ्रष्टाचार व जागो जागी सौच खड्ढे व इतर नागरीकांच्या विविध नागरी समस्या बाबत यावल शहरातील नवीन पाईप लाईन टाकण्याचे कामामध्ये साधारण ३ कोटी ६५ लाख रूपयाचे पुर्ण करण्यात आली आहे. सदरील काम सुध्दा बोगसरित्या झालेले आहे. यावल शहरात काही प्रभागात सात ते आठ वर्षापासून वस्ती विकसित झाले आहे.
त्या ठिकाणी आजपावेतो ना रस्ते झाले आहे. ना गटारी झाल्या आहे. त्याच प्रमाणे दलीत वस्ती मध्ये महीला व पुरूष शौचालय हे झालेले नसून अनेक महीला व पुरुष यांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून नविन पाईप लाईन टाकल्यापासून नागरिकांना मात्र मुलभूत हक्कांचे पाणी त्यांना मिळत नसून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
नविन वस्ती विकसित भागात नागरिकांच्या हक्कांचे मैदान ओपन स्पेस हा नागरिकांच्या लग्न सोहळा किंवा सुख-दुःखात वापरात येणारा ओपन स्पेस नागरिकांना न विचारात घेता सलग्न त्या ठिकाणी बगीचा विकसित करून पैसे खाण्याचा धंदा करून ठेवला आहे अनेकओपन स्पेसमध्ये झालेले गार्डनची दुरावस्था काही महिन्यातच झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात अनेक गटारीची कामे व रस्ते ही कामे अतिशय नित्कृष्ट स्वरूपाची केली आहे. सदरील कामाची चौकशी मी पक्षपाती करण्यात यावी जेणेकरून यावलकर आपल्या हक्काची मुलभुत समस्या मिळवण्यासाठी नगरपरिषद नियमित कर भरत असून त्यांना नागरिकांना कोणत्याही मुलभूत सुविधा आजपावेतो पुरविण्यात आलेली नाही. तरी त्या सर्व सहा मुद्दे लक्षात घेऊन आपण याबाबत नगरपालिका यावल येथे येऊन स्वत:हा पाहणी करून सदर मुद्दयावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहीत कक्षाच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात येईल याची कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी प्रशासन व नगर परिषद प्रशासनाची राहील याची आपण शासन दुस्तरी नोंद घेण्यात यावी.
अशी विनंती एका लिखित निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कडे केली असुन , मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हा संघटक चेतन अढळकर, राजेंद्र निकम जिल्हा संघटक रस्ते आस्थापना विभाग अजय तायडे जिल्हा उपसंघटक जनहित किशोर नन्नवरे तालुका अध्यक्ष जनहित यावल गौरव कोळी शहराध्यक्ष यावल शहर मनसे श्याम पवार तालुका अध्यक्ष जनहित यांच्या स्वाक्षरी आहेत.