ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

भडगाव प्रतिनिधी । महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी समाज संघटनांच्या वतीने तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला असून यासंदर्भातील निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले आहे.

या मोर्चास आदर्श कन्या विद्यालय पासुन सुरुवात झाली ते पारोळा रोड, चाळीसगाव रोड चौफुली, बस स्थानक परीसर या मार्गाने मोर्चा तहशील कचेरीवर नेण्यात आला. मोर्चात “एक नवे पर्व ओबीसी सर्व, आरक्षण वाचवा. सविधान वाचवा, आश्या स्वरुपाच्या घोषणा देण्यात आल्याने परीसर दणाणुन गेला होता.

सदर निवेदनात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात वकील नियुक्त करावे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. ओ. बी. सी. आरक्षणात कोणताही फेर बदल करू नये व आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये, ओ. बी. सी. संवर्गातील संख्या वाढल्याने आरक्षणात टक्केवारीची वाढ करण्यात यावी, ओ. बी. सी. संवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी, शैक्षणीक क्षेत्रात ओ.बी. सी. संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण १००% फी माफीच्या सवलती लागू करण्यात यावी, ओ.बी.सी. संवर्गातील जनगणना करण्यात यावी, ओ. बी. सी. महामंडळाचा संख्येनुसार निधी वाढवून देण्यात यावा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची उत्पनांची मर्यादा वाढवावी. अश्या मागण्या निवेदनात नमुद आहेत.

याप्रसंगी महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, डॉ. उत्तमराव महाजन, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा ॲड. वैशाली महाजन, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणाताई महाजन, सौ. आरती शिंपी, तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हाध्यक्ष शामराव पाटील, दिनेश पाटील, भगवान महाजन, राजेंद्र महाजन, संजय भिकनराव महाजन, प्रदीप महाजन, निलेश मालपुरे, संजय पवार, भरत चव्हाण, सुभाष ठाकरे, गोरख वेळीस, मनोहर चौधरी, संतोष महाजन ,संतोष पाटील, माळी पंचमंडळ अध्यक्ष प्रकाश महाजन, आनंदा महाजन, विक्रम सोनवणे, महेश महाजन, अशोक महाजन, दिलीप महाजन, दगडू महाजन, नंदलाल आढाव, विनोद शिवराम महाजन, मनोज महाजन, चिंधू मोकळ, संतोष परदेशी, प्रवीण महाजन, संजय महाले, पंढरीनाथ बोरसे, शशिकांत महाजन, रमेश महाजन, कैलास जगन्नाथ माळी, अरुण महाजन, विजय सुखदेव माळी, शशिकांत देवचंद महाजन, आबा महाजन, संजय महाजन, राजाराम महाजन, प्रकाश शिवराम महाजन, दत्तात्रय रघुनाथ महाजन, गौरव महाजन, मनोज खैरनार, गुलाब महाजन, दत्तू माळी, रामलाल महाजन, अनिल महाजन, नीलेश महाले, डी के मोरे, अशोक महाजन, विठ्ठल बारकू पाटील, रमेश महाजन आदी मोर्चात सहभागी झाले होते.

 

 

 

Protected Content