खेडी शिवारातील नागरिकांचे विविध समस्यांबाबत मनपा आयुक्तांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील खेडी शिवारातील नागरिकांनी विविध समस्यांबाबत जळगाव मनपा आयुक्तांना मागण्याचे निवेदन ३ जुलै रोजी दिले. या निवेदनात असे दिलेले आहे की, या खेडी शिवार परिसरात गंदा नाला वाहतो. पावसाळयात हा नाला ओव्हरफ्लो होऊन त्याचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नाल्यातील केरकचरा आणि सापासारखे प्राणी आजूबाजूच्या घरात शिरतात. त्या घाण कचऱ्यामुळे परिसरात दूर्गधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तरी आपण या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करावी.

खेडी शिवारात पिण्याचे पाण्यासाठी पाईप फक्त टाकून ठेवलेले आहे. पण त्यातून पाणीपुरवठा होत नाही तरी मनपा आयुक्तांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, खेडी शिवारात ५ – ६ वर्षांपासून वस्ती असून देखील पक्का रस्ता येथे बांधता आला नाही. पावसाळयात या कच्चा रस्त्यामुळे खड्डयांमुळे अपघातही होतात त्यामुळे आयुक्तांनी या समस्येकडे दखल घेत रस्ता करून द्यावा, खेडी शिवारात विजेचे खांब नाहीत त्या परिसरात रात्री प्रकाश देणारे एकही लाईट नसते. या परिसरात मनपाकडून कोणतीही सुविधा मिळत नाही. या सर्व समस्याबाबत खेडी शिवारातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले.

Protected Content