जळगाव प्रतिनिधी । शहरातील कालींका माता चौकात टाकण्यात आलेले दुभाजक हे प्रभाग क्र १७ मध्ये येत असल्याने व अयोध्यानगर मधील वाहनधारकांना जुने जळगाव मध्ये अंजिठा चौफुली या लांब फेराने जावे लागत असल्याने आज भाजपाचे नगरसेवक डॉ. विरण खडके, नगरसेविका रंजना वानखेडे यांनी नहीचे संचालक सिन्हा व जिल्हाधिकारी राऊत यांना याबाबत निवेदन दिले आहे.
या वेळी सिन्हा oval shaped circle आणि rumble strip braker बसविण्याचे अश्वासन दिले. व ज्या ठिकाणी दुभाजक लावलेले आहे. तिथे रस्ता आहे ते पण काढु असे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी विजय वानखेडे, युवा मोर्चा महानगर जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मंडल क्र ३ युवा मोर्चा अध्यक्ष निखील सुर्यवंशी, योगेश काळे, गौरव येवले, योगेश जंगले, हेमंत खडके, गुड्डु कोल्हे, पवन सरोदे, शैलेश काळे, प्रशांत सरोदे, हेमंत नेमाडे, ललित चौधरी यांच्यासह आदि उपस्थित होते.