मुक्ताईनगर प्रतिनिधी । विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या सत्र परीक्षेचे शुल्क 50% टक्के कमी करून विद्यार्थ्यांनसह पालकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव रोहित काळे आणि जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्यातर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदनाव्दारे देण्यात आले आहे.
कवियत्री बहिणाबाई चौकशी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा येणाऱ्या बहुतांशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव व प्रतिनिधी भारत (संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक) रोहित काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांची समस्या व्यक्त केली. लगेच त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष अॅड सिद्धार्थ इंगळे यांच्याशी चर्चा केली.
सध्या संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून दिवसेंदिवस वाढतच असून सद्यस्थितीत गंभीर स्वरुप धारण केलेले आहे, त्यामुळे सर्व विद्यापीठांनी सत्र परीक्षा online घेण्याचा सोयीस्कर निर्णय घेतला आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने घेणार आहेत, ऑनलाईन परिक्षा आणि ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला येणारा खर्च यात खुप तफावत आहे, तसेच गेल्या वर्षभरापासून ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वच विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे, त्यामुळे मा. कुलगुरु महोदय व संचालक (परिक्षा) महोदय यांना सर्व विद्यार्थी व पालक यांच्या वतीने महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन संघटनेने केली.
सामाजिक बांधिलकी आणि अर्थसहाय्यचा दिलासा म्हणून होऊ घातलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे परिक्षा शुल्क सरसकट माफ करावे किंव्हा त्यात 50 टक्के कपात करावी अशी मागणी जिल्हा सचिव रोहित काळे व जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी निवेदना द्वारे केली,
आपले विद्यापीठ हे आदिवासी भागात असून मागच्या वर्षी देखील आपण पूर्ण परीक्षा शुल्क माफ केली होती या वर्षी देखील आपण कराल अशी आशा जिल्हासचिव रोहित काळे यांनी व्यक्त केली.
नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन कार्यरत आहे, या आधीपण आपल्या विद्यापीठाने संकट समयी विद्यार्थी व पालक यांच्या बाजूने उभे राहून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, पुन्हा एकदा सद्यपरिस्थितीचे गांभिर्य आणि आर्थिक अडचण विचारात घेऊन नक्कीच आपण दिलासा देऊन सर्वांना सहकार्य कराल असे निवेदना द्वारे कळविले.