पट्टयाने मारहाण करून परप्रांतीयाला चौघांनी लुटले

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जम्मू काश्मिर येथील एका प्रौढाचा रस्ता आडवून कंबर पट्ट्याने बेदम मारहाण करत जवळील ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे  घडला आहे. मारहाण करणाऱ्या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सईद नुर मोहम्मद अद्राबी (वय-४५) रा. पुलवामा, जम्मू काश्मिर  हे प्रौढ व्यक्ती मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावानजीकच्या शेताजवळून जात असतांना कुऱ्हा काकोडा येथील रहिवाशी डिगंबर रमेश सोनवणे, परमेश्वर रघूनाथ भोलाणकर, महादेव आत्माराम भोलाणकर आणि अमोल संतोष घटे यांनी त्यांचा रस्ता आडवून त्यांना कंबर पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच सईद यांच्याजवळील ३० हजारांची रोकड देखील जबरी हिसकावून पोबारा केला. तसेच पुन्हा पैसांची मागणी करत प्रौढाला हायवेवर सोडून दिले. ही घटना घडल्यानंतर सईद नुर मोहम्मद अद्राबी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मुक्ताईनगरपोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू हे करीत आहे.

Protected Content