शासन निधीतून कोव्हिशिल्ड लस खरेदी करुन १८ वर्षापुढील नागरिकांना देण्याबाबत निवेदन

सावदा प्रतिनिधी । कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत असून सावदा शहरातील नागरिकांसाठी नगरपालिका फंड, १४,१५ वित्त आयोगा किंवा इतर निधीतून शासनामार्फत कोव्हिशिल्ड लस खरेदी करुन १८ वर्षापुढील नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे , सध्या जगामध्ये व देशांमध्ये कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातले आहे. सदरील आजारामुळे बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा प्रसंगी आपल्या देशात व राज्यात को विषय व covid-19 अशा लस देण्यात येत आहे. परंतु लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे व मागणी जास्त प्रमाणात आहे. तरी आपण आपल्या सावदा शहरातील नागरिकांना  नगरपालिका फंड किंवा 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग किंवा इतर निधीतून लस शासनामार्फत खरेदी करून अठरा वर्षाच्या पुढील नागरिकांना देण्यात यावी व आपले कार्य करावे व जनतेची सेवा या माध्यमातून करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.