‘या’ लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान मिळण्याबाबत निवेदन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भुमिहीन, अपंग, विधवा, संजय गांधी, श्रावणबाळ आणि परित्यक्ता अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान अद्याप प्राप्त झाले नसून ते तात्काळ उपलब्ध व्हावी, अशा मागणी निवेदन लहुजी विद्रोही सेनेतर्फे येथील तहसीलदारांना देण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडुन मिळणारे अनुदान मिळत नसल्याने या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली असुन त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तसेच नविन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने ठरविलेले वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असुन हे खुपचं कमी असल्याने संबंधित तलाठी उत्पन्नाचा दाखला देत नाही. त्याकरिता २१ हजार रुपये ही मर्यादा वाढवुन ४० हजार रुपये करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन लहुजी विद्रोही सेनेतर्फे आज दि. २८ जुन रोजी पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.

सदरचे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी लहुजी विद्रोही सेनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कांबळे, जळगांव जिल्हा महिला अध्यक्षा रेखा कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, विलास पाटील, रेखा परदेशी, राधा मरसाळे, गेंदाबाई परदेशी, राधा परदेशी, नरसु पाटील उपस्थित होते.

 

Protected Content