जळगाव मनपाने मालमत्ता कर रद्द करावी; रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी | मुंबई महापालिकाने मालमत्ता कर रद्द करण्याच्या धर्तीवर जळगाव महापालिकेने कर रद्द करावा, या मागणीचे निवेदन सोमवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०० चौरस फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून त्यांच धर्तीवर जळगाव महानगरपालिकेनेही मालमत्ता कर रद्द करावी, अशी अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले, लोकांचे उत्पन्न घटले, अशातच मायक्रोन व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  मालमत्ता कर रद्द केल्यास सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य जनता आर्थिक मंदीने त्रस्त झालेली आहे.

जळगावकर आपापल्या मालमत्ता कर नियमित भरत असतात मात्र त्या बदल्यात जळगावकरांना महानगरपालिका कडून पाहिजे तसा सुखसुविधा मिळत नसल्याचा आरोप महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केला आहे. शहरातील रस्ते, गटारी स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. झोपडपट्टी भागातील शाळांची दुरावस्था झाली असल्याने गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच ज्या प्रमाणात महानगरपालिका नागरिकांवर शिक्षण कराचा बोजा वाढवीत आहे, त्याप्रमाणात कोणताही शिक्षण सुविधांमध्ये वाढ होताना दिसत नाही तसेच शहरातील काही भागात रस्त्याचे कामे सध्या सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे दिसून येत आहे, तसेच नाशिक क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडून तपासणी करूनच ठेकेदाराला बिलअदा करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदनावर महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, अनिल लोणकर, संदीप तायडे, बबलू भालेराव, शुभम सदावर्ते, केतन वारके, विशाल महाले, पंकज पवार, सतीश गायकवाड, भीमराव सोनवणे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

 

Protected Content