वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना परवानगी मिळण्याबाबत निवेदन (व्हिडीओ)

बुलढाणा प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, वृत्तसंकलन करण्यासाठी फक्त अधिस्वीकृत पत्रकारांनाच मुभा देण्यात आली इतर पत्रकारांना देखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी टीव्ही जर्नाललिस्ट संघटने कडून बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे. 

मात्र राज्यात अश्या पत्रकारांची संख्या फार कमी असल्याने ज्या पत्रकारांकडे आपल्या वृत्तवाहिनीचे ओळखपत्र आहे किंवा ज्या पत्रकाराची जिल्हा माहिती कार्यालयात नोंदणी केली आहे अशा सर्व पत्रकारांना या लॉकडाऊन मध्ये वृत्त संकलनासाठी फिरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी टीव्ही जर्नाललिस्ट संघटने कडून बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी वसीम शेख, युवराज वाघ, संजय जाधव , चंद्रकांत बर्दे, संदीप वानखडे, संदीप शुक्ला, नितीन पाटील, आदी पत्रकार उपस्थित होते.

Protected Content