रावेर प्रतिनिधी । मराठा आरक्षणावर लावलेली स्थगिती त्वरित उठवावी अन् यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती त्वरित उठविण्यात यावी, चालू आर्थिक वर्षातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा राज्यसरकारने करावा, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा, राज्य सरकारने सुरु केलेल्या मेगा भरतीला स्थगिती देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटींची तरतूद करावी, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबाचे पुनर्वसन करावे, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तत्काळ सुरु करावे, राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी या मागण्या रावेर तालुका सकल मराठा समाजातर्फे करण्यात आल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सी जी पवार यांनी स्वीकारले. यावेळी मराठा समाज मंडळाचे संचालक कडू पाटील, वामनराव पाटील, अंबादास महाजन, बाजार समितीचे संचालक नीलकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, रवींद्र चौधरी, घनश्याम पाटील, जे. के. पाटील, सी एस पाटील, प्रशांत पाटील, योगेश महाजन, गणेश महाजन, किशोर पाटील, पितांबर पाटील यांच्यासह समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते.