राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आक्रोश निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी ।  महाराष्ट्रातील मागासवर्गीयांचा पदोन्नतीचा ३३ टक्के आरक्षण रद्द करणारा ठराव बेकायदेशीर असल्याने तो तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रदेशा उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, शहराध्यक्ष प्रल्हाद विसावे, शाखाध्यक्ष वाल्मिक मोरे, मांगीलाल मोरे, गिरीष भोसले, पुरूषोत्तम चिमणकार, निवृत्ती बाविस्कर, समाधान लोखंडे, भगवान बाविस्कर, सुनिल विसावे आदी उपस्थित होते. 

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व मागासवर्गीयांचा पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव बेकायदेशीर असल्याने तो तत्काळ रद्द करण्यात यावा. हा ठराव येत्या ३० दिवसात रद्द न झाल्यास राज्यातील संपूर्ण मागासवर्गीयांना सोबत घेवून राष्ट्रीय चर्मचार महासंघ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलानामुळे होणाऱ्या नुकसानास शासन जबाबदार राहील याबाबत निवेदन देण्यात आले.

Protected Content