राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथील कंठवली येथील भक्त निवास बेकायदेशीर ठरवून इमारत पाडणारे अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेचेच्या वतीने बुधवारी १ जून रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई येथील कंठवली येथे बंजारा समाजाच्या दैवत संत सेवालाल महाराज यांचे मंदिर परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या भक्ती निवास हे बेकायदेशीर आहे असे महापालिकेने ठरविले आहे. इमारत ही बेकायदेशीर असल्याचे ठरवून हुकूमशाही पद्धतीने येथील अधिकाऱ्यांनी इमारत पाडून टाकले. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय बंजारा परिषदच्या वतीने भक्ती निवास पाडणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले आहे.  निवेदनावर जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद पवार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content