मुक्ताईनगर येथे बस भाडे दरवाढ विरोधात मनसेचे निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने वाढविलेले बस भाडे दरवाढ त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असल्याने दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बस भाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. ही भाडेवाढ सर्वसामान्य व गरीब होतकरू जनतेला न परवडणारे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर गरीब व सामान्य जनता ही फक्त बसनेच प्रवास करतात. तरी वाढविलेली भाडेवाढ त्वरित थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुक्ताईनगर बस आगार प्रमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले

Protected Content