केंद्र शासनाच्या पक्षपाती धोरणाच्या निषेर्धात महाविकास आघाडीचे यावल नायब तहसीलदारांना निवेदन (व्हिडिओ)

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र शासनाकडून ‘ईडी’ व इतर शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचे म्हणत या निषेर्धात येथील महाविकास आघाडीने यावलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदन दिले आले.

यावल येथे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती या घटक पक्षाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांना पाठींबा देण्यासाठी पक्ष एकवटले असून त्यांनी केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांनी करत असलेल्या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्या संदर्भात यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात गेल्या दोन वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे विशेषतः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करू पाहत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत लाजिरवाणे असून नवाब मलिक यांच्या अटकेचा आम्ही यावल तालुका महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करतो असं निवेदनात सांगितलं आहे.

यावल तालुका महाविकास आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलं. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, प्रहारचे अभिमन्यू चौधरी यांनी केले. या प्रसंगी देवकांत पाटील, जगदीश कवडीवाले, तालुका प्रमुख रवी सोनवणे, फैजपूर राष्ट्रवादी शहर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, नरेंद्र पाटील, भागवत आखाडे, विजय साळी, निवृत्ती, हाजी फारुक शेख युसुफ, आयुब खान, कबीर खान करीम खान, अनिल जाधव, अनिल जंजाळे, अमोल भिरूड, उज्वला महाजन, नईम शेख, पुंडलिक बारी, अरुण लोखंडे, सईद शेख, वसंत पाटील, सुनील जोशी, शेख जाकीर शेख हारून, मोहसीन खान, शेख रियाज शेख साबीर दिनू पाटील कबीर खान देवकांत पाटील ॲम्बी तडवी प्रतिभा निळ, द्वारका पाटील, एड रियान पटेल,, शेख अश्पाक शेख शौकत, जितेंद्र गजरे, किशोर माळी, वसंत पाटील, शेख सादिक शेख हमीद, शेख अन्वर हाजी, अभिमान्यू चौधरी, अशोक चौधरी आदींनी निवेदनात निषेध व्यक्त केला आहे.

व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4201465149956244

 

Protected Content