पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्या दहा वर्षांपासून विकासाची कामे थांबलेली आहेत. यातच या प्रभागात काही स्थानिक समाज बांधवांनी खुल्या भूखंडावर दावा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी आक्षेप नोंदवत थेट मुख्याधिकारी यांचे दालन गाठत आपल्या समस्या व्यक्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा नगर पालीका हद्यीतील, अकृषक सर्वे नं. ४३/१/अ/१ब मध्ये शेकडो प्लॉट धारक आहेत. नगर परिषदेने सदर भुखंडातील खुला भुखंड हा विकसित करण्याचे ठरविले आहे. सदर भुखंडावर येथील नागरीकांची इच्छा असुन तो नगर परिषदेने विकसित करावा सदर जागेवर सदरचा भुखंड हा कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तींना दिला जावु नये त्यावर कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक मंदीर, मस्जीद, स्तुप, वगैरेसाठी तो देण्यात येवु नये कारण काही बाहेरील लोकांचा तसा प्रयत्न चालु आहे.
सदर भुखंड हा काही व्यक्ती तेथील नागरीक असल्याचे व प्लॉट धारक असल्याचे भासवुन खोटया सहयांचा आधार घेवुन हडप करण्याच्या प्रयत्नात असुन त्याठिकाणी नागरीकांना गार्डन, सकाळ व संध्याकाळी फिरण्यासाठी वाकिंग पार्क अथवा ऑक्सीजन पार्क, करून वृक्षारोपन करण्यात यावे सदर खुल्या भुखंडात कोणत्याही प्रकाराचे स्टेज बनवु नये अथवा त्याठिकाणी कोणीही बाहेरील व्यक्ती झेंडा लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते अतिक्रमण काढण्यात यावे व त्यावर नियंत्रण असावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अकृषक सर्वे नं. ४३/१/अ/१ब, हा विकसित करावा त्यावर नागरीकांना गार्डन, सकाळ व संध्याकाळी फिरण्यासाठी वाॅकिंग पार्क अथवा ऑक्सीजन पार्क, करून वृक्षारोपण करावे तसेच कोणत्याही प्रकारे स्टेज बनवु नये व नगर पालिकेचे नियंत्रण असावे अशा आशयाचे निवेदन प्रभाग क्रमांक ९ मधील स्थानिक रहिवासी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिले आहे.
पाचोरा शहरातील जुना अंतुर्ली रोड वरील नव्याने वास्तव्यास आलेल्या अमृत नगर भागात विद्यमान आमदार किशोर पाटील यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. या भागातील समस्यांबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी आ. किशोर पाटील यांच्या भेटी घेवुन समस्यांचा पाढा वाचला आहे. मात्र अद्याप पर्यंत या भागात भुयारी गटारी, रस्ते, पथदिवे, घंटागाडी या मुलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नसल्याने स्थानिक नागरिकांकडुन नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.