खेडी खुर्द येथील स्मशानभूमीच्या जागेबाबत ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हाप्रशासनाला निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द ग्रामपंचायतीने गावातील स्मशानभुमीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर शेजारील संबंधित व्यक्ती हक्क दाखवून जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देत नाही. स्मशानभूमीची जागा मिळावी या मागणीसाठी खेडी खुर्दचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी निवासी  उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देणयत आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द ग्रामपंचायतीने गावासाठी स्मशानभूमीसाठी गट नंबर २७० ही राखीव ठेवण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ठराव केला होता. याबात भूमी अभिलेख कार्यालय एरंडोल यांना पत्र देवून जागा मोजणी करण्याची मागणी केली होती.

९ नोव्हेंबर रोजी गट नंबर २७० ची मोजणी करण्यासाठी संबंधित कार्यालयातील अधिकारी  व ग्रामपंचायतीचे सदस्य गेले. त्यावेळी शेजारील गट नंबर २६९चे धारक व मालक भागाबाई आखाडू सोनवणे, आधार आखाडू सोनवणे, विशाल आधार सोनवणे व त्यांच्या घरातील सर्व सदस्य यांनी स्मशानभूमीची जागा मोजण्यास मज्जाव करून वाद घालण्यास सुरूवात केली.

या जागेवर त्याचा हक्क असल्याचे सांगू लागले. दरम्यान जागा मोजली तर आम्ही जीवाचे बरेवाईट करून धमकी दिली. शेवटी नाईलाजाने अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य मोजणी न करताच निघून गेले. यासंदर्भात स्मशानभूमीची जागा मिळावी या मागणीसाठी खेडी खुर्दचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2989037141346092

Protected Content