घरकुल लाभार्थ्यांचे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या विविध योजनांर्गत घर बांधण्यासाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे जाहीर असतांना लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत वाळू देण्यात आलेली नसल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील सरपंच, माजी सरपंच यांच्यासह लाभार्थ्यांनी मुक्ताईनगर तहसीलदारांसह गटविकास अधिकारी यांना  वाळू देण्याबाबत निवेदन सादर केले आहे.

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील २९ घरकुल लाभार्थी यांची अपूर्ण अवस्थेत असणारी घरकुलची कामे अपुर्ण पडली आहे. चांगदेव येथील सरपंच निखिल बोदडे व माजी सरपंच पंकज कोळी यांनी लाभार्थी यांना सोबत घेऊन तहसीलदार निकेतन वाढे, गटविकास अधिकारी श्री अढागळे यांना निवेदन दिले. अपुर्ण घरे पुर्ण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करून वाळू योग्य दरात उपलब्ध करून द्यावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने लाभार्थी यांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.  याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.  यावेळी सोबत चांगदेव गावातील तब्बल २९ घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Protected Content