संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी घेतली कीर्तनकार दुर्गाताई मराठे यांची भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत साहित्यिक सदानंद मोरे यांच्या कन्या तसेच संत श्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या अकराव्या वंशज असलेल्या अमृताताई मोरे यांनी आज जुनी कोथळी मुक्ताई मंदिरात आदिशक्ति मुक्ताईंचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी कीर्तनकार हभप दुर्गाताई मराठे यांची भेट घेवून सखोल अध्यामिक चर्चा केली.

 

अमृताताई यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले याप्रसंगी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज, जूनी कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प.उद्धव महाराज जुनारे उपस्थित होते. यावेळी अमृताताई यांनी महिलांचा सप्ताह खूप छान झाला तो माझी माऊली चॅनलच्या माध्यमातून पाहिला खूप छान वाटले असे गौरवोद्गार काढले. लागलीच हरणे महाराज यांनी महिला सप्ताहाच्या संयोजक मुक्ताई फडावरिल कीर्तनकार ह.भ.प दुर्गाताई संतोष मराठे यांना कळविले असता त्यांनी लागलीच मुक्ताई मंदिर गाठले. येथे अमृताताई व दुर्गाताई यांच्यात सखोल अध्यात्मिक चर्चा झाली. यावेळी रिंगण मासिकचे संपादक सचिन परब, सासवड येथील प्रसिद्ध कीर्तनकार तथा इंजिनियर हभ.प अभय जगताप, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प रविंद हरणे महाराज, जूनी कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प.उद्धव महाराज, ह भ प रतिराम महाराज आदींची उपस्थिती होती.
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण –
आम्ही ज्या जगतगुरू तुकोबाराय यांचे अभंग घेवून कीर्तनात निरूपण करीत असतो. आज त्यांच्या कुळातील अकराव्या वंशज अमृताताई मोरे यांचे आज प्रत्यक्ष दर्शन होत व त्यांच्याशी संवाद साधता आला त्या वेळेस असे वाटले की “धन्य आजी दिन संत दर्शनाचा | अनंत जन्माचा क्षीण गेला ||” अशी प्रतिक्रिया किर्तनकार हभप दुर्गाताई संतोष माराठे यांनी दिली.

Protected Content