एसबीसी आरक्षणाबाबत देवांग कोष्टी समाजाचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी ।  एसबीसी आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविण्यात यावे यासंदर्भात  देवांग कोष्टी समाज आणि विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने बुधवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एससी आणि एसटी असणाऱ्या सर्व सवलतील जश्याच्या तश्या देण्यात यावेत, एसबीसी प्रवर्गाला क्रिमिलेअरचे तत्व लागू करणार नाही या दोन्ही निर्णयाचा अंमलबजावणी करण्यात यावी, वस्त्रोद्योगाच्या सवलतीच्या योजनेची व्याप्ती पारंपारीक विणकर असणाऱ्या जाती व एसबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे त्या सवलतींची व्यप्ती वाढविण्यात यावी, एसीबीसीचे दोन टक्के आरक्षण ५० टक्क्यांमध्ये बसविण्यात यावे. अश्या मागण्या करण्यासाठी यापुर्वी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, उपोषण व आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतू याबाबत आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या निवेदनाची दखल घेवून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर कोष्टी समाजाचे विठ्ठल कोष्टी, दिनेश पारखे, अजय आळंदे, विजय खराडे, कैलास पंधारे, अविनाश गुरसाळे, सुनिल भागवत, विजय पंदारे, सुनिल पंदारे, अर्चना आळंदे, शैला हरीमकर, दिपक अलोणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content