मुंबई प्रतिनिधी । भाजपशी आघाडी करण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे सांगत अजित पवारांचे विधान हे संभ्रम करणारे असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
अजित पवार यांनी लागोपाठ केलेल्या ट्विटच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादीचे राज्यात सरकार असल्याचे अधोरेखीत केले होते. या पार्श्वभूमिवर, शरद पवार यांनीदेखील एका ट्विटच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे. यात नमूद केले आहे की, भाजपशी आघाडी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आम्ही शिवसेना व काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अजित पवार यांनी केलेले विधान हे संभ्रम निर्माण करणारे असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शरद पवारांनी अजितदादांचा दावा खोडून काढल्याचे दिसून आले आहे.
खाली पहा : शरद पवार यांनी केलेले ट्विट.
There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra.
NCP has unanimously decided to ally with @ShivSena & @INCMaharashtra to form the government. Shri Ajit Pawar’s statement is false and misleading in order to create confusion and false perception among the people.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019