गटशिक्षणाधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांना संस्थाचालकाने विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर शिक्षक समन्वय संघटनेच्या माध्यमातून मुक्ताईनगर चे तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच संबंधित संस्थाचालकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत शिक्षक संघटनांतर्फे मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे तसेच मुक्ताईनगरच्या गट विकास अधिकारी श्रीमती निशा जाधव यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन मुक्ताईनगर गट शिक्षणाधिकारी मदन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सहाय्यक गटविकास अधिकारी वाय आर अढागळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

अमळनेर येथे गट स्तरीय सभा आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांना संस्था चालकाने विनाकारण मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर येथे शिक्षक समन्वय संघटनेतर्फे सरचिटणीस हिरालाल कळसर ,केंद्रप्रमुख शांताराम तायडे , केंद्रप्रमुख संजय ठोसर , विजय चौधरी , उर्दू केंद्रप्रमुख भिकन, केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख गणेश कोळी , अनिल पवार , प्राथमिक शिक्षक संघाचे सहकार्य अध्यक्ष अतुल लोढे , कार्याध्यक्ष विकास पाटील , ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील अढागळे , विश्वंभर अडकमोल , सोमनाथ गोंडगिरे, वेंकटेश बाराते , वसीम मासुलदार , तसेच मार्गदर्शक मनोज लुल्हे , अध्यक्ष प्रवीण पाटील , सतीश बोरले , गट साधन केंद्राचे महेंद्र मालवेकर , योगेश भोसले , सचिन पाटील जितेंद्र बावस्कर , मधुकर सैतवाल , मनोहर गडे , विनोद कोळी , भगवान कांबळे , हेमंत बोरकर प्रवक्ते दीपक झाल्टे यांच्यासह असंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते. सदर घटनेचा निषेध काळ्याफिती लावून करण्यात आला.

Protected Content