साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव हे राष्ट्रीय महामार्ग सहा वरचे सर्वात मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या २० ते २५ हजाराच्या जवळपास आहे. या गावात गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून चालवण्यात येणारे महाविद्यालय, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय आणि यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोठे महाविद्यालय असून गावात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वावर होतो. त्यामुळे गावात एकही रुग्णवाहिका नसल्यामुळे रात्री दिवसा मोठा मनस्ताप ग्रामस्थांना सहन करावा लागत होता.
साकेगावचे कर्तव्यदक्ष प्रभारी सरपंच सागर अनिल सोनवाल हे काही दिवसांसाठी का होईना प्रभारी सरपंचाचा चार्ज घेताच साकेगावकरांचा जो पाच-सात वर्षापासूनचा रूग्वाहिकेचा विषय होता तो त्यांनी तत्काळ मार्गी लावत गावात अत्यंत रुग्णवाहिका घेऊन दिल्यामुळे सागर सोनवाल यांचे गावात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. मात्र गावातील काही विघ्न संतोषी लोक मुद्दाम याला फाटे आणण्यासाठी असा प्रश्न बुद्धिपरस्कृत करत आहेत. तर एकीकडे सागर सोनवाल यांना साकेगावकर डोक्यावर घेत असल्याचे दिसत आहे. सागर सोनवाल यांनी त्यांनी प्रभारी सरपंचाचा चार्ज घेताच सर्वात आधी १५ वित्त आयोगातून त्यांनी रुग्णवाहिका आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील बाहेरगावातून आलेले हजारो विद्यार्थी तसेच रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रूग्णवाहिकेत २४ तास ऑक्सिजनची सुविधा असल्याने याचा फार मोठा ग्रामस्थांना समाधान वाटत आहे. साकेगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सागर सोनवाल यांचे कौतुक करत आहे.