बॉक्सर विंजेद्र सिंग काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आगामी लोकसभा निवडणूकीच्या रणधूमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणूकीचा प्रचार करत आहे. परंतू भाजप काँग्रेसला सतत धक्के देत आहे. काँग्रेसचे नेते बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकीर्दची सुरूवात केली होती. त्यांनी दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय नव्हते. २०२३ मध्ये त्यांनी राजकारण सोडले होते. पण आता ते पुन्हा सक्रिय झाले आहे आणि त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. ते भारताचे विश्वप्रसिध्द बॉक्सर आहे. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये त्यांनी आपले नाव आणि देशाचे नाव मोठे केले आहे.

Protected Content