मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून असलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला ‘मुहूर्त’ लाभला असून यातील पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाच्या ज्येष्ठांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काल सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून मोठ्या खंडपिठाचे निर्माण आणि यावरील खटला हा दीर्घ काळ चालू शकतो. अर्थात, हा मुद्दा आता बर्याच काळ पुढे ढकलला जाईल हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाठोपाठ आता राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे सर्वांने वेध लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषदेत बोलतांना येत्या काही दिवसांमध्ये मंत्र्यांची शपथविधी होणार असल्याचे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमिवर, आता मंत्रीमंडळाचा विस्तार निश्चीत झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाचे फक्त ज्येष्ठ मंत्री शपथ घेतील. आणि नंतरच्या टप्प्यात उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान, पहिल्या यादी दोन्ही बाजूंकडून नेमके कोण असणार ? आणि त्यांना कोणती खाती मिळणार ? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.