नाभिक समाजाचा चाळीसगावात राज्य मेळावा

 जळगाव प्रतिनिधी । राज्य नाभिक समाजाचा मेळाव १३ रोजी चाळीसगाव येथे आयोजीत करण्यात आला आहे.

मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, सिक्किम या राज्यांमध्ये नाभिक समाजाचा आर्थिकदृष्ट्या अतिमागास प्रवर्गात समावेश केलेला आहे. तर आसाम, आंध्र प्रदेश, मेघालय, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. तर महाराष्ट्रात ही मागणी करून देखील याला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. या अनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी चाळीसगावात समाजाचा राज्य मेळावा होणार आहे.

समाजबांधवांनी याला उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय वाघ यांनी केले आहे. 

 

Protected Content