फैजपूर येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘कृषिधन २०२४’

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा विकास मंडळ पाल,संचालित कृषी विज्ञान केंद्र पाल तर्फे, राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन कृषीधन २०२४ दिनांक ५ जानेवारी ते ८  जानेवारी २०२४ या काळात हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन- श्रीमती शोभाताई गायधने ,संचालिका -विदर्भ नैसर्गिक शेतीमाल उत्पादन वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक आत्माराम झांबरे होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. महेश महाजन सर यांनी केले. शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल ते त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. या कार्यक्रमांमध्ये मशरूम उत्पादन पुस्तिका गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान व केळी उत्पादन तंत्रज्ञान यांचे विमोचन करण्यात आले अध्यक्ष भाषणातून झांबरे सर यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवरती भर द्यावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  डॉ .धीरज नेहेते यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव पाटील व मीनाताई महाजन यांनी केले .या कार्यक्रमात शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरिषदादा  चौधरी यांच्या संकल्पनेतून सेंद्रिय शेती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्यात विजयी स्पर्धकांना ट्रॉफी, बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र दिले गेले. त्यात मुलांमध्ये प्रथम- अभिषेक बिरपन, रावेर द्वितीय -विजया अखलकर रावेर, तृतीय- पूर्वेश सोनवणे, भुसावळ तर मुलींमध्ये प्रथम -अश्विनी काटोले जळगाव, द्वितीय- जान्हवी सपकाळे रावेर ,तृतीय- आरती भालेराव फैजपूर या स्पर्धकांनी विजय मिळवला या स्पर्धकांना प्रथम क्रमांकास 1111 रुपये द्वितीय 701 रुपये तृतीय 501 रुपये बक्षीस दिले गेले या कार्यक्रमास शोभाताई गायधने ( संचालक विदर्भ नैसर्गिक शेतीमाल उत्पादन वर्धा) तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक झांबरे प्रभाकर आप्पा सोनवणे, डॉ. उल्हास पाटील, प्रल्हाद बोंडे, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन- लीलाधर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे, रमेश महाजन,पालगावचे सरपंच कामिल शेठ काँग्रेस कमिटी रावेरचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, भाऊसाहेब वाळके, भरत वारे इत्यादी उपस्थित होते.

Protected Content