सावदा, ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांना ‘महाराष्ट्र शिक्षक पँनल’च्या वतीने पुणे येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक सेवासन्मान’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शिक्षक पँनल यांच्या वतीने पुण्याच्या भोसरी येथील येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान सोहळा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यतेखाली रविवार, दि.१५ मे रोजी संपन्न झाले. उदघाटक म्हणून मराठी सिनेअभिनेत्री डाँ.निशिगंधा वाड तर प्रमुख पाहूणे म्हणून नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सुधीर तांबे,मिठाराम राठोड उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील राजेंद्र तुळशीराम चौधरी यांना यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे व मराठी सिनेअभिनेत्री डाँ.निशिगंधा वाड यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात येऊन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
चौधरी हे वीस वर्षांपासून मुंबईच्या बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक गरजू निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे.चौधरी यांचा स्वलिखित अमृतवेल कविता संग्रह प्रकाशित असून दिवा तुळशीरामाचा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. श्री.चौधरी हे शिक्षक, लेखक, पत्रकार व कवी देखील आहेत.
राजेंद्र चौधरी यांचे मुंबई प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा.आशीर्वाद लोखंडे, विविध पदाधिकारी, ज्येष्ठ कवी प्रा.डाँ.राम नेमाडे, सुनील बोरोले, गोपाळ महाजन, रमेश महाजन, विनोद महाजन, डाँ.चारुदत्त चौधरी, डाँ.विवेक कोल्हे, विजय महाजन, डाँ.विजय धांडे, भगवान केशव फेगडे, सुधाकर महाजन, मिलींद वायकोळे, टेनूदास फेगडे, ललित बोंडे, युवराज लोधी, विनायक चौधरी व निखील चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.