एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव येथे एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावल येथिल आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जिल्ह्यातील इतर भागांसाठी दुरवर असल्याने भडगांवला उपकार्यालय सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन एरंडोल एकलव्य संघटनेकडून प्रांताधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे जळगांव जिल्हयातील आदिवासी बांधवांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे सुरु असुन सदरचे कार्यालय हे जिल्हयाचे एका बाजुला असुन त्या कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागतो. त्यामुळे आदिवासींवर आर्थिक भार देखील येतो.
या कार्यालयाचे उपकार्यालय चाळीसगांव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगांव, अमळनेर, जळगांव तालुक्यातील आदिवासींसाठी सोयीचे असलेले भडगाव शहरात सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पाचोरा- भडगांव विधानसभेचे विद्यमानआमदार यांनी देखिल अधिवेशनात जळगांव जिल्ह्यातील काही क्षेत्रातील आदिवासी बांधवांची गैरसोय होत असल्याने विधानसभेत मागणी केली आहे. त्यानुसार भडगांव येथे लवकरात लवकर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन एकलव्य संघटनेचे अपंग सेल जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे, भिवसन सोनवणे, सुभाष मालचे, तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे, जय मोरे, विनोद मालचे, राहूल ठाकरे, छोटू अहिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.