यावल येथे भारतरत्न डॉ आंबेडकर जयंती उत्सव समितीची घोषणा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने आयोजन समितीची स्थापना करण्यात आली असुन अध्यक्षपदी ऍड सागर अरूण गजरे तर उपाध्यक्षपदी संदीप पारधे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे .

यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, अनिल जंजाळे ,अरूण लोखंडे,अरूण गजरे, भिमराव गजरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित समाज बांधवांची बैठक पार पडली.

या बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंती उत्सवाबाबत नियोजन करण्यात आले. या अनुषंगाने जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी ऍड सागर अरूण गजरे यांची तर उपाध्यक्षपदी संदीप पारधे यांची निवड जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत खजिनदार भारत भालेराव , सचिवपदी अमोल सुरवाडे,सहसचिव शुभम गजरे तर सलाहगार मनोहर सोनवणे , भिमराव दत्तु गजरे,अरूण सुपडू गजरे , प्रशांत बोरेकर ,अनिल जंजाळे , अरूण लोखंडे ,प्रमोद पारधे, विजय बंडू गजरे यांचा समावेश आहे.

Protected Content