मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराला जोमाने लागा : चित्रसेन पाटील

 

mangesh chavhan 1

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी भारत व देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र नंबर एक करण्याचे स्वप्न पाहिले आहे. या विकास पर्वामुळे विधानसभेत विजय तर नक्की आहे. त्यासाठी माझ्यासहित आपण सर्व मतदार बंधू-भगिनी मंगेश चव्हाण यांच्या प्रचार कार्यात सहभागी होऊ या. मतदानाच्या परम पवित्र कर्तंव्याचे पालन करून आदर्श नागरिक होऊ या… त्यामुळे हा विजय अधिक लक्षणीय होईल…म्हणून चव्हाण यांच्या प्रचाराला जोमाने लागा, असे आवाहन बेलगंगा साखर कारखाण्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी केले आहे. भाजप उमेदवार मंगेश चव्हाण हे चित्रसेन पाटील यांच्या घरी भेट घेण्यासाठी मंगळवारी दुपारी गेले होते. त्यावेळी श्री.पाटील यांनी हे आवाहन केले.

 

 

भाजप उमेदवार मंगेश चव्हाण हे चित्रसेन पाटील यांच्या घरी भेट घेण्यासाठी मंगळवारी दुपारी गेले होते. यावेळी चव्हाण यांनी श्री.पाटील यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला.  यावेळी चित्रसेन पाटील यांनी म्हटले की, चाळीसगाव तालुक्याचे वैभव असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे पुनरूज्जीवन लोकसहभागातून करताना चाळीसगाव विधानसभेचे प्रतिनिधीत्व करावे ही इच्छा लोकांमधून तसेच स्नेहीजनांकडून व्यक्त झाली. मी हाकेला प्रतिसाद दिला आणि भाजपा श्रेष्ठींकडे चाळीसगाव विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. पक्षाने संधी दिली तरच लढायचे हे आधीच जनता जनार्दनाच्या दरबारात जाहीर केले होते. कारण सत्ता हे विकासाचे साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. अंतिम साध्य लोकप्रेम, लोकसहभाग, लोकपाठिंबा लोकाशीर्वाद आहे. तो बेलगंगा पुनर्उभारणी चळवळीत मिळाला. तेव्हाही देवासारखी माणसे भेटली.तन मन धनाने बेलगंगा मिशनमध्ये भाग घेतला आणि आताही सर्वसामान्य शेतकरी, नागरिक, पक्षातील ज्येष्ठ, तरूण मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्नेही, नातेवाईक, पालकमंत्री ना.गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सर्वच भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्रीगण तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांनीच उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिले, उत्साह वाढविला. त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान, चित्रसेन पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराला जोमाने लागण्याचे आवाहनही यावेळी केले. भाजपाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

आई मला आशीर्वाद दे : मंगेश चव्हाण

चाळीसगाव विधानसभेसाठी मंगेश चव्हाण या युवा कार्यकर्त्यांला उमेदवारी मिळाल्याचे स्वागत आहे. ३५ इच्छुकांमध्ये सर्वच उमेदवार पक्षात योगदान असलेले, सक्षम आणि योग्य होते. तिकीट जाहीर झाल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी मंगळवारी चित्रसेन पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचा आशीर्वाद घेतला. बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांच्या मातोश्री श्रीमती लीलाताई पाटील यांचा चरणस्पर्श करीत चव्हाण यांनी ‘आई, मला विजयाचा आशीर्वाद दे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Protected Content