यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केन्द्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आधार भूत किमतीच्या शासकीय भरड धान्य, ज्वारी खरेदी सुरूवात करण्यात आली आहे. विविध मान्यवर व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत यावल येथील केद्राचे उद्घाटन शासकीय गोदाम व्यवस्थापक वाय. डी. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान ८३ शेतकरींच्या नावाची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. महिना अखेर पर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य गोदाम परिसरात आयोजीत या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम धान्य विक्रीस आलेले शेतकरी लिलाधर सुधाकर झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी बांधव यांच्या हस्ते तोल काट्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर नेहेते, संचालक यशवंत फेगडे, कोरपावली संस्थेचे सचिव मुकुंदा तायडे व कर्मचारी नेमिचंद महाजन योगेश साळुंके व धान्य उत्पादक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.