भुसावळ देवळाली पॅसेंजर सुरू करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन !

चाळीसगाव प्रतिनिधी । टाळेबंदीच्या काळापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच सर्व रेल्वे पासधारक प्रवाशी हे  रेल्वेसेवा बंद असल्याने दुचाकी व चारचाकी  गाड्यांनी चाळीसगाव ते जळगाव व चाळीसगाव ते नाशिक प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करून भुसावळ देवळाली पॅसेंजर येत्या सात दिवसांत सुरू करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रेल्वे प्रशासनाला आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दिला आहे.

टाळेबंदी लागू झाल्यापासून भुसावळ देवळाली पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतर सेवा बजावत असलेली मंडळी यांची गैरसोय होत आहे. त्यांना चाळीसगाव ते जळगाव जाण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांने जावे लागते. त्यामुळे हा प्रवास शाररिक व आर्थिक दृष्ट्या परवडणारा नाही. लॉकडाऊन नंतर राज्यभर लोकल व पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू झालेल्या आहे. मात्र खान्देश विभागात अशी एकही पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात आलेली नाही. भुसावळ देवळाली पॅसेंजर येत्या सात दिवसांत सुरू करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रेल्वे प्रशासनाला आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. आधीच कोराणा काळात अनेक जणांनी नोकऱ्या गवमावल्या आहेत व पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्यामुळे बेरोजगारी मध्ये वाढ होत आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे मंडळ प्रबंधक यांना दि.११/१०/२०२० रोजी लेखी पत्र देऊन प्रवाश्यांच्या भावना पोहचविल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत कारवाई करण्यात न आल्यामुळे येत्या ७ दिवसात भुसावळ देवळाली पॅसेंजर सुरू न केल्यास भारतीय जनता पक्ष व रेल्वे प्रवाशी संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल व यासाठी होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार असाल असा इशारा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

Protected Content