खुशखबर ; बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीची सुवर्णसंधी

job 1

 

मुंबई वृत्तसंस्था । बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑफिसर पदासाठी भरती निघाली असून एकूण ३०० जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदांसाठी ३०० जागा रिक्त असल्याची माहिती असून जनरल ऑफिसर स्केल कक पदांसाठी 200 तर जनरलिस्ट ऑफिसर स्केल ककक पदासाठी 100 जागा असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणं मिळवलेले असणे आवश्यक आहे. संगणकाची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.

पात्रता
या पदासाठी उमेदवाराला अर्ज भरायचा असेल तर किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 35 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 35 किंवा 38 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. स्केल-कक पदांसाठी साधारण 31 हजार 705 ते 45 हजार 950 रुपये पगार असू शकतो.

निवड प्रक्रिया कशी असेल
उमेदवाराला आधी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ते झालं की पेमेंट प्रोसेस करावी लागेल. उमेदवाराची पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा होईल. परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवाराची मुलाखत होईल आणि त्यातून निवड करण्यात येईल.

जनरल आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी एक हजार 180 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. एससी, एसटी श्रेणीसाठी 118 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईन स्वरुपात भरणं बंधनकारक आहे. तुम्ही नेटबँकिंग, क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड स्वरुपात पैसे भरू शकता.

Protected Content