Home राष्ट्रीय तामिळनाडूतील मंदिरात चेंगराचेंगरी; 7 ठार, 10 जण जखमी

तामिळनाडूतील मंदिरात चेंगराचेंगरी; 7 ठार, 10 जण जखमी


temple inside
 

तिरुचिरापल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडूमधील तुरायूरमधील मंदिरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. दरम्यान, मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिरात मंदिराचा शिक्क्याचे वितरण करण्यात येत असतांना ही चेंगराचेंगरी झाली.

रूप्पास्वामी मंदिरातील शिक्का मिळाल्यास त्यामुळे घरामध्ये संपन्नता येते अशी तेथील लोकांची भावना आहे. यामुळे गावातीलच नाहीत तर आजुबाजुच्या जिल्ह्यांमधीलही हजारो लोक हे शिक्के मिळविण्यासाठी येतात. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण सुरु केले तेव्हे तो मिळविण्य़ासाठी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावेळा चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत. मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की पूजा सुरु असताना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे ही दुर्घटना घडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound